कारण नसतांना तरूणाला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी येथे काही एक कारण नसतांना मजुर तरुणाला दोन जणांनी बेदम मारहाण केल्याची घडली. याप्रकरणी दोन जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी येथे खलील अनुर पटेल वय ३१ हा तरुण राहतो. तो मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घरासमोर उभा असतांना यावेळी याठिकाणी याच परिसरात राहणारे प्रवीण साबळे व त्याचा भाऊ हे दोन्ही आले. दोघांनी काही एक कारण नसतांना खलील पटेय यास शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत खलील यांच्या गळ्यातील चैन कोठेतरी पडून गहाळ झाली आहे. याबाबत खलील पटेल याने दिलेल्या तक्रारीवरुन प्रवीण साबळे व त्याचा भाऊ दोन्ही रा. सुप्रिम कॉलनी या दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

Protected Content