Home Cities जळगाव नशिराबादला तरुणांना शासनाच्या विविध योजनांचे मार्गदर्शन 

नशिराबादला तरुणांना शासनाच्या विविध योजनांचे मार्गदर्शन 

0
1


नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची ११० वी वार्षिक सर्वसाधारण सभा फ्रूट सेल सोसायटीच्या सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संस्थेचे चेअरमन किरण भोजराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सभेत सभापटलावरील सर्व महत्त्वाच्या विषयांना सर्व सभासदांनी एकमुखाने आणि बहुमताने मंजुरी दिली. याप्रसंगी संस्थेचे संचालक पंकज महाजन यांची नशिराबादच्या प्रभारी नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने लालचंद पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना पंकज महाजन यांनी संस्थेचे व उपस्थित सभासदांचे मनःपूर्वक आभार मानले.

वार्षिक सर्वसाधारण सभेचे औपचारिक कामकाज संपल्यानंतर तरुण शेतकरी व सुशिक्षित बेरोजगारांसाठी शासनाच्या विविध योजनांबाबत एक विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्रात पशुपालन, कोल्ड स्टोरेज, वेअरहाऊस उभारणी, ट्रॅक्टर खरेदी तसेच विविध आधुनिक शेती अवजारांसाठी शासनाकडून मिळणारे अर्थसहाय्य, योजनेच्या अटी, शर्ती आणि अर्ज प्रक्रियेबाबत अत्यंत सविस्तर व सोप्या भाषेत माहिती देण्यात आली.

जिल्हा कृषी विभाग जळगावचे जिल्हा संसाधन व्यक्ती समाधान पाटील यांनी उपस्थित तरुण व सुशिक्षित बेरोजगारांना या विविध योजनांची माहिती देत मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना व शंकांना समाधान पाटील यांनी योग्य उत्तरे देऊन त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले.या संपूर्ण उपक्रमाला सोसायटीचे सर्व संचालक, सभासद, तरुण शेतकरी आणि सुशिक्षित बेरोजगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन संस्थेचे सचिव प्रशांत भंगाळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार विनोद रंधे यांनी मानले.


Protected Content

Play sound