“पैसे मागितले तर मुडदाच पाडतो” म्हणत तरूणाला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील लोंढरी गावात उसनवारीने घेतलेल्या पैशांच्या कारणावरून तरूणाला कुऱ्हाडीच्या दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली तर जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी २ मे रोजी दुपारी ३ वाजता चार जणांविरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहूर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जितेश सोना चव्हाण (वय-२४) रा. लोंढरी ता. जामनेर हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम काम करून आपला उदरनिर्वाह करतात. जितेश याने गावात राहणारा गणेश शांताराम पवार याला १२ हजार रूपये उसनवारीने दिले होते. त्यामुळे जितेश हा उसनवारीने दिलेले पैसे परत घेण्यासाठी २८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता गणेश पवार याच्याकडे मागणी केली. याचा राग आल्याने गणेश शांतराम पवार याने हातात असलेला कुऱ्हाडीचा दांडा डोक्यावर मारून गंभीर दुखापत केली. तर शांताराम मेरचंद पवार, दिलीप शांताराम पवार आणि आशाबाई शांताराम पवार यांनी देखील शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच परत पैसे मागितले तर मुडदाच पाडू अशी धमकी दिली. जितेशने रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी २ मे रोजी दुपारी ३ वाजता पहूर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रविंद्र देशमुख करीत आहे.

Protected Content