३० एप्रिलपर्यंत वन्यजीव अभयारण्य पर्यटनासाठी राहणार बंद

जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता 30 एप्रिल, 2021 पर्यंत लॉकडाउन घोषित केलेला आहे. त्याअनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील सर्व वन्यजीव अभयारण्य ३० एप्रिलपर्यंत पर्यटनासाठी बंद करण्यात आले आहे. 

तथापि, यावल वन्यजीव अभयारण्यासह नाशिक विभागातील अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई हरिशचंद्रगड वन्यजीव अभयारण्य, नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर वन्यजीव अभयारण्य, धुळे जिल्ह्यातील अनेरडॅम वन्यजीव अभयारण्य 30 एप्रिल, 2021 पर्यंत पर्यटनासाठी बंद करण्यात आले आहे. असे अ. मो. अंजनकर, वनसंरक्षक, (वन्यजीव), नाशिक यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.  

 

Protected Content