बिग बी राष्ट्रीय चित्रपट सोहळ्याला राहणार अनुपस्थित

big b12

मुंबई प्रतिनिधी । ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे आज (दि.२३) रोजी होणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यास अनुपस्थित राहणार आहे. प्रकृती ठीक नसल्याने आपण या सोहळ्यास उपस्थित राहू शकत नाही, अशी माहिती अमिताभ बच्चन यांनी ट्विटवर दिली आहे.

अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत म्हटलं की, “ताप आला आहे… प्रवास करण्याची परवानगी नाही… दिल्लीत राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सहभागी होऊ शकत नाही… अत्यंत दुर्दैवी आहे… मला याचं दु:ख होत आहे.” असे ट्वीट बीग बींनी केले आहे.

तापाने आजारी असल्याने पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाऊ शकत नसल्याचे अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करुन सांगितले. तापामुळे डॉक्टरांनी त्यांना प्रवास करण्यास मनाई केली असून आराम करण्याचा सल्ला दिला आहे. यासंबंधीचे ट्वीट बिग बींनी रविवारी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी केले आहे. त्यानंतर ही बातमी सोशल मीडियावर पसरताच त्यांच्या चाहत्यांनी त्यांची तब्येत लवकर ठीक व्हावी, यासाठी प्रार्थना सुरु केली.

Protected Content