भोईटे नगरातील एसएनडीटी महिला महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी भोईटे नगरात एसएनडीटी महिला महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सोमवार २० फेब्रुवारी रोजीपासून बेमुदत संप पुकारला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अनेकवेळा निवेदन देण्यात आले. परंतू शासनाच्या अडमुठ्या आणि उदासीन धोरणामुळे कोणत्याही मागण्या पुर्ण करण्यात आलेल्या नाहीत. शासनाच्या निषेधार्थ म्हणून यापूर्वी देखील कामकाजावर बहिष्कार केला होता. त्यानंतर निदर्शने व काळ्याफिती लावून कामकाज केले होते. १६ फेब्रुवारी रोजी देखील एक दिवसाचा लाक्षणिक संप केला होता, तरीदेखील शासनाने याची कुठलीही दखल न घेतल्याने अखेर सोमवारी २० फेब्रुवारी रोजी पासून अकृषी विद्यापीठे व संलग्नीत महाविद्यालयाचे बेमुदत बंद पुकारण्यात आले आहे. या अनुषंगाने भोईटे नगरातील एसएनडीटी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी बेमुदत काम बंद आंदोलनात सहभाग नोंदविला आहे. याप्रसंगी एसएनडीटी महाविद्यालयातील कला वाणिज्य व गृहविज्ञान महिला महाविद्यालयाचे स्थानिक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र चौधरी, कोषाध्यक्ष जितेंद्र पाटील, सचिव गणेश चौधरी यांच्यासह आदींनी सहभाग नोंदवला होता.

Protected Content