वरळी हीट अँड रन प्रकरणी बीएमडब्लूचा चालकाला अटक; कारचा मालक शिंदे गटाचा पदाधिकारी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वरळी येथे येथे आज सकाळी हीट अँड रनची घटना उघडकीस आली आहे. मासळी बाजारातून मासे आणण्यासाठी गेलेल्या एका दाम्पत्याला एका भरधाव बीएमडब्लू चालकाने उडवले. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तिचा पती सुदैवाने जखमी झाला आहे. अपघातानंतर चालक फरार झाला होता. पोलिसांनी त्याला अटक केली असून कार चालक हा शिंदे गटाचा पदाधिकारी असल्याचे तपासात पुढे आले आहे. हा अपघात आज सकाळी ५.३० च्या सुमारास येथील अॅट्रिया मॉलजवळ घडला होता.वरळी कोळीवाडा येथे राहणारे प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा हे दाम्पत्य सकाळी मासे खरेदीसाठी दुचाकीवरुन ससून डॉकला जाऊन तेथून मासे खरेदी करून सकाळी घरी परत येत असतांना एका भरधाव बीएमडब्लुने त्यांचा दुचाकीला धडक दिली. या धडकेत कावेरी नाखवा ही महिला कारच्या बोनेटवर जाऊन कोसळली. चालकाने गाडी न थांबवता महिलेला फरफट नेले. यामुळे गंभीर जखमी झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. यानंतर आरोपी घटनास्थळी न थांबता, फरार झाला.

ही गाडी शिंदेंच्या शिवसेनेचे पालघरचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा चालवत असल्याचे तपासात पुढे आले आहे. बीएमडब्ल्यू कारने महिलेला चिरडल्यावर आरोपीने पळ काढला. पोलिसांनी मिहीरचे वडील तसेच शिंदेंच्या शिवसेनेचे पालघरचे उपनेते राजेश शहा यांना ताब्यात घेतले आहे. तर आरोपी व फरार असलेल्या महिरचा पोलिस शोध घेत आहेत. पतीने महिलेला तातडीने मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी महिलेला मृत्यू झाल्याचे जाहिर केले. या घटनेची माहिती मिळाल्यावर वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी थोड्याच वेळापूर्वी वरळी पोलीस ठाण्यातील पोलिसांची भेट घेतली. या प्रकरणात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर काय कारवाई केली, याची माहिती देखील त्यांनी घेतली. तसेच त्यांनी पीडित नाखवा कुटुंबाची भेट घेऊन आरोपींवर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

वरळी हीट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा (वय २४) याने रात्री जुहू येथील एका बारमध्ये दारू प्यायली. यानंतर गोरेगावला गेला घरी गेल्यानंतर त्याने घरच्यांना लॉन्गड्राइवरला जातो असे सांगितले. त्याने प्रवासादरम्यान मुंबईत आला आणि मुंबईतून पुन्हा गोरेगावला निघाला. मिहीर शहाने प्रवासादरम्यान मद्यप्राशन केले होते. अपघात झाला तेव्हा मिहीर व त्याच्या सोबत राजरुपी राजेंद्र सिंग बिडावत गाडी चालवत होते. वरळीतील नेहरू तारांगण येथील बसस्टाॅपच्या विरूद्ध दिशेला सकाळी ५.१५ वाजता हा अपघात झाला. सध्या मिहीरचा फोन बंद असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Protected Content