कोरोना बाधीत आढळल्याने शिव कॉलनीतील मुख्य प्रवेशाचा रस्ता बंद

जळगाव प्रतिनिधी । महामार्गाला लागून असलेल्या शिवकॉलनीत आज दुपारी दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने उपाययोजना म्हणून चौकातील प्रवेशाचा मुख्य रस्ताच महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी सील केला आहे.

अधिक माहिती अशी की , शिवकॉलनीच्या मुख्य चौकातील परिसर सील करण्यात आला आहे.पंचशील मेडीकलपासून तर चांदणी चौकच्या दरम्यान देवेश झेरॉक्स परिसरात एक पुरुष व एक महिला कोरोना बाधीत आढळून आली आहे. दोन दिवसांपूर्वीच मोकळ्या पटांगणासमोर कोल्हेनगरच्या कॉर्नरशेजारी एका कुटुंबातील पती- पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. तो परिसरही सील केला असून या परिसरातील रुग्णांची संख्या पाच इतकी झाली आहे. चांदणी चौक व शिवकॉलनीत प्रवेश करतानाचा मध्यवर्ती चौकात दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दीचे दृश्य दिसून येत असते. पोलीस गस्ती घालत असतात , मात्र ते निघून गेले की पुन्हा गर्दीचे स्वरूप प्राप्त होत असते. त्या भागात पोलीस कर्मचारी तैनात असावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

दरम्यान कोरोना आजाराचा शिरकाव वाढत चालण्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे.मुख्य परिसर सील झाल्याने आशाबाबानगर , खंडेरावनगर तसेच शामराव कॉलनी , हरीविठ्ठलनगरकडे जाणार्‍या नागरिकांची आणि वाहन धारकांची गैरसोय होणार आहे.

Protected Content