Home क्राईम एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षकपदी जयपाल हिरे

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षकपदी जयपाल हिरे

0
107

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांची जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती गुरूवारी १ डिसेंबर रोजी दुपारी करण्यात आले आहे. यासंदर्भात पोलीस अधिक्षक एस.राजकुमार यांनी बदलीबाबत दुजोरा दिला आहे.

काही दिवसांपुर्वीत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना बढती देण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्याकडे सध्या एमआयडीसी पोलीस ठाण्याचा प्रभारी पोलीस निरीक्षकाचा पदभार देण्यात आला होता. दरम्यान, अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांची एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या प्रभारीपोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधिक्षक एस.राजकुमार यांनी दुजोरा दिला आहे. अत्यंत शिस्तप्रिय पोलीस अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक जयपाल यांना ओळखले जाते. अनेक गुन्ह्यांची उकल त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती झाल्याने अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

 


Protected Content

Play sound