भुसावळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करणार – जिल्हाधिकारी राऊत (व्हिडीओ)

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहरातील कोरोना बाधीतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भुसावळ तालुक्यात आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रूग्णांची वाढता संख्या बघता लवकरच कृती आराखडा तयार करणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

कोरोनाची वाढत संख्या पाहून जिल्हाधिकारी यांनी भुसावळ शहरातील कंटेनमेंट झोनची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, तहसीलदार दीपक धीवरे, तालुका वैद्यकिय अधिकारी किर्ती फलटणकर संगीता पांढरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरण सांवत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठचे पोलीस निरीक्षक दिलिप भागवत, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुका पोलीस निरीक्षक रामचंद्र कुंभार यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, जिल्हाधिकारी राऊत यांनी नवोदय कोवीड केअर सेंअर, ट्रामा केअर सेंटर आणि भुसावळ रेल्वे कोवीड केअर सेंटरला भेट देवून पाहणी केली. सोबत गवळी वाडा परिसर, मामाजी टॉकीज परिसर आणि बद्री प्लॉट परिसरातील कंटेनमेंट झोनमधील समस्या जाणून घेतल्या व या संदर्भात माहिती जाणून घेत आवश्यक त्या सुचना जिल्हाधिकारी यांना प्रशासकीय यंत्रणेला दिल्यात.

Protected Content