शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये दोन दुकानांना आग; लाखोंचे नुकसान

भडगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दोन दुकानांना शॉर्टसर्कीमुळे लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. अग्निशमन पथकाने शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

याबाबत माहिती अशी की, “शहरातील अविनाश पवार शॉपिंग कॉम्प्लेक्समधील आकाश मोबाईल व समर्थ पॅथॉलॉजी लॅब या दोन दुकानाला रविवारी, रात्री १० वाजेच्या सुमारास शॉटसर्किटमुळे आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे दुकानातुन सुरूवातीला धूराच्या लाटा बाहेर पडत होत्या. आकश मोबाईलच्या मोबाईल बॅटरींचे स्फोट बंद शटर आडून येत होते.

यावेळी शॉपिंग कॉम्प्लेक्सचे मालक भूषण पवार यांनी काही नागरिकांच्या मदतीने कुलूप तोडत आग विझवण्यासाठी प्रयत्न केला परंतु आगीने रौद्ररूप धारण केले होते. यावेळी भूषण पवार, पत्रकार नितीन महाजन यांनी मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांना आगीची माहिती देत अग्निशमन गाडी पाठवण्याबाबत मागणी केली.

अग्निशमन गाडी आल्यावर कर्मचारी राजू पाटील, नितीन पाटील, शिंदे, बंटी महाजन, पोलीस प्रशासनचे स्वप्निल पाटील, विलास पाटील तसेच उपस्थित नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. तब्बल दोन तासाच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत दोन्ही दुकान मालकाचे जवळपास १७ लाखाचे रुपयाचे नुकसान झाले आहे. या आगीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा टोणगाव तलाठी राहुल पवार यांनी केला.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!