चोपडा येथे मतदार जनजागृती अभियान

WhatsApp Image 2019 10 04 at 3.23.26 PM

चोपडा, प्रतिनिधी | विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानाविषयी जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यानुसार चोपडा समाजकार्य महाविद्यालयच्या विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती अभियान अंतर्गत पथनाट्य सादर केले.

मतदारांमध्ये मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पथनाट्याचे चोपडा येथील विविध भागात आयोजन करण्यात आले आहे. तसेच विविध उप्रकम राबविण्यात येत आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, तहसीलदार अनिल गावित ,जनजागृती अभियान कार्यक्रमाच्या नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले, तालुका नोडल अधिकारी युवराज पाटील, राकेश पाटील, समाधान बाविस्कर यांनी नियोजन केले आहे.

Protected Content