प्रितीने आदिवासी समाजातून जिल्ह्यातील पहिली कलेक्टर व्हावे- सुनील देवरे ( व्ही डी ओ )

 

पारोळा : प्रतिनिधी । प्रगल्भ ईच्छाशक्तीव्दारे प्रितिने आदिवासी समाजातून जिल्ह्यातील पहिली कलेक्टर व्हावे असे मत रोशनी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील देवरे यांनी व्यक्त केले. ते पारोळा येथे रोशनी संस्थेव्दारा आयोजित प्रीती गायकवाडच्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते.

घरातील जेमतेम परिस्थिती आई -वडील निरक्षर आहेत मोलमजुरी करून घर चालविणारे रेखा गायकवाड व अजय गायकवाड या आदिवासी भिल्ल कुटुंबातील प्रिती अजय गायकवाड हिने नवोदय परिक्षेत पास होवून हे सिध्द केले की शैक्षणिक पार्श्वभूमी नसली तरी चालेल परंतु तीव्र इच्छा असेल तर आपण सर्व काही साध्य करू शकतो

हणमंत खेडे येथील रेखा व अजय गायकवाड या भिल्ल आदिवासी कुटुंबात जन्माला आलेल्या प्रिती हिने अतिशय कठीण परिस्थिती नवोदय परिक्षेत उत्तीर्ण होवून दाखविले आहे तिचा सत्कार रोशनी बहुउद्देशीय संस्थेच्या पारोळा येथील कार्यालयात संस्थेचे सचिव प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रकाश पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून न्यूज झेप इंडिया चे संपादक बाळु पाटील, शेतकरी संघटनेचे युवा शहराध्यक्ष निलेश चौधरी, अरूण पाटील, पाटील, एकनाथ पाटील, कैलास पाटील, राहुल पाटील हे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुरलीधर वाघ, भास्कर गायकवाड, विजय गायकवाड, वानुबाई गायकवाड तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

( https://m.facebook.com/story.php?story_fbid=3508480235938565&id=508992935887325  )

Protected Content