राजभवन घेराव मोर्चात सहभागी व्हा- सानंदा

खामगाव प्रतिनिधी । केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून नागपूर येथील राजभवनाला काँग्रेसच्या वतीन घेराव घालण्यात येणार असून यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

याबाबत वृत्त असे की, केंद्रातील भाजपा सरकारने नव्याने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकरी संघर्ष करीत आहेत. हे काळे कायदे रदद् करावे व पेट्रोल डिझेलच्या किंमतीत झालेली इंधन दरवाढ मागे घेण्याबाबत अखिल भारतीय काँग्रेसच्या कमिटीच्या सुचनेवरुन किसान अधिकार दिवस पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शेतकर्‍यांच्या मागण्यांना पाठींबा देत, इंधन दरवाढ केंद्र सरकारने मागे घ्यावी या मागण्यांसाठी शनिवार दि.१६ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नागपूर येथे राज्यपाल महोदय यांच्या निवासस्थान असलेल्या राजभवनला घेराव घालण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोर्चामध्ये काँग्रेसचे आजी-माजी मंत्री, खासदार,आमदार, प्रदेश पदाधिकारी संख्येने सहभागी होणार आहे.
यमध्ये बुलडाणा जिल्हयातील हजारो शेतकरी व काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सकाळी ११ वाजेपर्यंत नागपूर येथे पोहचुन घेराव आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले आहे.

Protected Content