पोलीस कॉलनीत महिलेची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पोलीस कॉलनीत राहणाऱ्या २७ वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नजमा बी जुमेर खाटीक (वय-२७) रा. पोलीस कॉलनी असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. नजमाबी आपल्या कुटुंबियांसह राहतात. रविवारी रात्री जेवण करून त्या कुटुंबाती सदस्यांसह झोपले. मध्यरात्री त्यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज सोमवार १२ जुलै रोजी उघडकीला आले. नातेवाईकांनी खाली उतरवून जिल्हा रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. निता भोंडे यांनी मृत घोषीत केले. घटनेची माहिती मिळतात एमआयडीसी पोलीस कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पो.ना. सुनिल सोनार, राजेंद्र ठाकरे यांनी पंचनामा केला. डॉ. भोंडे यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!