शेंदूर्णी येथे न्यूमोनिया लसीकरणास सुरुवात

 

 

शेंदूर्णी प्रतिनिधी | येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात न्यूमोनिया लसीकरण सुरूवात करण्यात आली.

लहान मुलांचे शरीर हे कमजोर असते. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती (immunity power) विकसित होत नसते, त्यामुळे कोणत्याही आजाराशी लढण्यासाठी ती सक्षम नसते. म्हणूनच मुलांना अनेक आजार होण्याचा धोका असतो. छोटेसे इन्फेक्शन सुद्धा गंभीर आजारचे रूप घेऊ शकते. म्हणूनच लहान बाळाला जीवापेक्षा जास्त जपले जाते. लहान मुलांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या आजारांपैकी एक आजार म्हणजे न्युमोनिया (pneumonia) होय. न्युमोनिया आजारावर वेळीच उपचार न केल्यास तो जीवघेणा सुद्धा ठरू शकतो म्हणूनच योग्य वेळीं योग्य उपचार करणे आवश्यक असते

साडेतीन महिन्यापासून एकवर्षपर्यंतच्या बालकांना( न्यूमोनिया लस) देण्यात आल्या या वेळी जि .प .सदस्य आदरणीय सरोजनीताई संजयराव गरुड ,डॉ.राहुल निकम,आरोग्य कर्मचारी,परिचारिका व आरोग्यसेवक उपस्थित होते

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!