खळबळजनक : एक दिवसाचे स्त्री जातीचे मृत अभ्रक उकीरड्यावर फेकले !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील सुनसगावात एक दिवसाचे स्त्री जातीचे मृत अभ्रक उकीरड्यावर फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला होता. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या संदर्भात अधिक असे की, भुसावळ तालुक्यातील सुनसगाव गावात राहणाऱ्या एका महिलेने जन्म घातलेल्या स्त्री जातीच्या अभ्रकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे महिलेने गुप्तपणे विल्हेवाट लावण्यासाठी गावातील एका उकिरड्यावर फेकून दिले होते. हा प्रकार १४ मार्च रोजी दुपारी २ वाजता उघडकीला आल्यानंतर गावात खबळबळ उडाली होती. या घटनेची माहिती भुसावळ तालुका पोलीसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेवून मृत अभ्रकाचे पंचनामा केला. दरम्यान, प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल दिपक जाधव यांनी भुसावळ तालुका पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी १६ मार्च रोजी दुपारी दीड वाजता महिलेवर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील हे करीत आहे.

Protected Content