कृष्णापूरी सोसायटीची रविवारी निवडणूक

पाचोरा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |   तालुक्यातील सतत “अ” वर्गात असलेल्या व १ कोटी ४० लाख स्व भांडवल असलेल्या कृष्णापूरी वि. का. सोसायटीची रविवारी निवडणूक होत असून ही वि.का. सोसायटी गेल्या २३ वर्षांपासून सतिष शिंदे यांच्या ताब्यात आहे.  ही निवडणूक चुरसीची ठरणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

वि. का. सोसायटीच्या  निवडणुकीत आमदार किशोर पाटील व माजी आमदार दिलीप वाघ हे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पुरस्कृत परीवर्तन पॅनलच्या माध्यमातून पडद्यामागचे कलाकारांसाठी भुमिका बजावत आहेत. तर सतत २३ वर्षांपासून आपल्या स्वकर्तृत्वावर संस्था ताब्यात ठेवणारे सतिष शिंदे व भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन भा.ज.पा. पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल तयार केल्याने या निवडणुकीला चांगलाच रंग भरला आहे. आजी – माजी आमदारांच्या प्रतिष्ठेची तर सतिष शिंदे व अमोल शिंदे यांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. मात्र निवडणूक निकालानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

कृष्णापुरी वि. का. सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भा.ज.पा. पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलमध्ये  सर्वसाधारण जागेसाठी सतिष परशुराम शिंदे, दिगांबर रामदास अहिरे, शिवाजी अर्जून चौधरी, हेमंत नामदेव चव्हाण, शिवाजी गोविंदा महाजन, काशिनाथ रामभाऊ पाटील, ओमप्रकाश प्रभाकर पाटील, महिला राखीव जागांसाठी मुक्ताबाई सिताराम बोरसे व सिंधुबाई पंडित शिंदे, इतर मागासवर्गीय जागेसाठी प्रकाश एकनाथ चौधरी, अनुसूचित जाती जमाती मतदार संघ प्रेमलाल शामलाल देसाई व विमुक्त जाती जमाती मतदार संघासाठी धोंडू शिवराम हटकर हे उमेदवार आहेत. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत परीवर्तन पॅनलच्या माध्यमातून सर्वसाधारण जागेसाठी बापू कैलास चौधरी, सतिष नारायण चौधरी, सुरेश रुपचंद देवरे, संतोष पांडुरंग पाटील, सुभाष गिरिधर पाटील, स्वप्निल विजय पाटील, अभिजित वसंत सिनकर, सुदर्शन आत्माराम सोनवणे, महिला राखीव जागांसाठी इंदुबाई प्रकाश पाटील, कुसूमबाई रामदास पाटील, इतर मागासवर्गीय जागेसाठी विष्णू देवराम चौधरी, अनुसूचित जाती जमाती मतदार संघासाठी फकिरा सांडू ब्राम्हणे, विमुक्त जाती जमाती मतदार संघासाठी रविंद्र बाबूलाल भोई हे उमेदवार आहेत.

Protected Content