पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची धमकी

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसंस्था | नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी एका इमेलद्वारे देण्यात आली आहे. क्राइम ब्रांचच्या कार्यालयामध्ये या धमकीचा मेल मिळाला असल्याची गुप्तचर विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली आहे.

या अनुषंगानं धमकीच्या मेलचा अधिक खोलात तपास करण्यात येत असून  पंतप्रधान मोदी यांना मारण्याची धमकी देण्याच्या कटाचा पर्दाफाश होऊ नये यासाठी आपण आत्महत्या करणार असल्याचेही या ई मेल मध्ये नमूद करण्यात आलं आहे. मोदी यांना जीवे मारण्यासाठी २० स्लीपर सेल तयार असून त्यांच्याजवळ २० किलो आरडीएक्‍स असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यासह दहशतवादी संघटनेशी आपले संबंध असल्याचा दावा इमेल कर्त्याने केला आहे. या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे. याचा तपास सुरू आहे.

Protected Content