भीम आर्मीच्या राज्य सचिवपदी सुपडू संदानशीव

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील बोराळे येथील सुपडू संदानशीव यांची भीम आर्मीच्या राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, भीम आर्मी च्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी बोराळे गावाचे रहिवासी सुपडू संदानशिव यांची भीम आर्मी भारत एकता मिशन या आंतरराष्ट्रीय सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र राज्य(सचिव) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा ग्रामीण आणी आदीवासी क्षेत्रातील सर्वसामान्यात व्यक्तिपर्यंत वाढलेला दांडगा जनसंपर्क या दृष्टीकोणातुन जळगाव जिल्ह्यातील राज्य प्रवक्ते रमाकांत तायडे,जिल्हा अध्यक्ष गणेश सपकाळे,महा सचिव श्रीकांत वानखेडे व संघटक विक्रम प्रधान यांच्या साथीचे काम पाहून संघटनेचा ग्रामीण भागात विस्तार करण्यासाठी त्यांच्यावर महाराष्ट्र राज्य (सचिव) म्हणून जबाबदारी सोपवली आहे.

सुपडू संदानशिव हे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद रावण यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.
संघटनेच्या अनेक शाखा संदानशिव यांनी उघडलेल्या आहेत. राज्यात भीम आर्मी जोमाने वाढविण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन शिंग, प्रभारी दत्तू मेढे,महाराष्ट्र राज्य प्रमुख प्रफुल शेंडे यांनी सुपडू संदानशिव यांना निवडीचे पत्र दिलेले आहे. त्याच बरोबर महाराष्ट्र राज्य प्रचार प्रसिद्धी प्रमुख राजेश गवळी यांनी सुद्धा प्रसिद्धी द्वारे कळवले आहे. सुपडु संदानशिव यांच्या निवडीचे समाजाच्या सर्व स्तरांमधून स्वागत होत आहे.

Protected Content