कोरोनावरील लसीची प्राण्यांवरील चाचणी यशस्वी

नवी दिल्ली- भारत बायोटेकच्या कोरोनावरील कोवॅक्सिन लसीची प्राण्यांवरील चाचणी यशस्वी ठरली आहे. भारत बायोटेकने याबाबतची घोषणा ट्विटद्वारे केली आहे.

भारत बायोटेकने माकडांना लसीचे डोस दिले होते. प्राण्यांवरील चाचणीचे परिणाम लाइव्ह व्हायरल चॅलेंज मॉडेलमध्ये संरक्षणात्मक कार्यक्षमता दर्शवितात, असे भारत बायोटेकने म्हटले आहे.

सध्या या लसीची देशातील विविध भागांत पहिल्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. सेंट्रल ड्रग्‍स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशनने याच महिन्यात भारत बायोटेकला दुसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी दिली आहे.

हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनी लिमिटेड, पुण्याची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही), आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या तीन संस्थांच्या सहभागातून ही लस विकसीत करण्यात आली आहे.

Protected Content