१५०० स्क्वेअर फुटांपर्यंत घर बांधण्यासाठी परवानगीची गरज नाही

 

औरंगाबादः वृत्तसंस्था । आता १५०० स्क्वेअर फुटांपर्यंत घर बांधण्यासाठी परवानगीची गरज नाही, अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी केलीय.

 

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज औरंगाबाद महापालिकेच्या अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नगरविकास विभागाच्या वतीने मोठा निर्णय घेतला गेला असून, ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची बांधकामे नियमित होतील,  असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यातील ५५ हजार कुटुंबांना गुंठेवारीचा फायदा होणार असून, ३ हजार स्क्वेअर फूट घरं बांधणाऱ्यांसाठी १० दिवसांत परवानगी देणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं. थकीत वीजबिल असलेल्या शेतकऱ्यांची वीज तोडणी केली जात असल्याने याबाबत मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांशी बोलणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय.

 

सध्या राज्यभरात गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणीही त्यांनी भाष्य केलं. पूजा चव्हाण प्रकरण संवेदनशील असून, या विषयात मला जास्त माहिती नाही. माहिती घेऊनच या विषयावर बोलणार असून, सध्या बोलणं उचित नसल्याचंही त्यांनी सांगितलंय.

Protected Content