पूजा चव्हाण आत्महत्येची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल

 

मुंबई :  वृत्तसंस्था ।  पूजा चव्हाण आत्महत्येची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याचेही बोललं जात आहे.

 

राष्ट्रीय महिला आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेबाबत राष्ट्रीय महिला आयोगाला ट्विटरवर टॅग करण्यात आलं होतं. दखल घ्यावी अशी विनंती करण्यात आली होती. या विनंतीनुसार, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी याबाबत दखल घेतली आहे.

 

 

दरम्यान रेखा शर्मा यांनी याबाबतच्या योग्य कारवाईसाठी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. लवकरात लवकर चौकशी करावी. तसेच या चौकशीचा अहवाल सादर करावा, असे यात नमूद करण्यात आले आहे.

 

 

 

राष्ट्रीय महिला आयोग भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार भारत सरकारने १९९२ मध्ये स्थापन केलेली वैधानिक संस्था आहे. १९९० च्या राष्ट्रीय महिला आयोग कायद्याद्वारे तिची स्थापना करण्यात आली. या आयोगाची रचना एक अध्यक्ष आणि पाच सदस्य अशी असते. यातील अध्यक्षाची नेमणूक केंद्र सरकारद्वारे केली जाते. पाच सदस्यापैकी एक सदस्य अनुसूचित जाती आणि एक सदस्य अनुसूचित जमातीपैकी असणे आवश्यक असते.

 

 

भाजपने थेट शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं  नाव घेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Protected Content