चाळीसगावात इशारा मोर्चा; लेखक नेमाडेंच्या अश्लील लिखाणाविरूध्द निषेध (व्हिडीओ)

चाळीसगाव जीवन चव्हाण । बंजारा समाजातील स्त्रियांविषयी अश्र्लील लिखाण केल्याबद्दल लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या निषेधार्थ बंजारा क्रांती दलाच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर इशारा मोर्चा काढण्यात आले असून नेमाडेंवर गुन्हा नोंदविण्यात यावे यासाठी तहसीलदार व शहर पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

 भालचंद्र वनाजी नेमाडे (रा. सांगवी ता.यावल जि. जळगाव) द्वारा लिखीत हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ही कादंबरी भटकळ पॉप्युलर प्रकाशन, मुंबई द्वारा जुलै २०१० मध्ये प्रकाशित झाली आहे. या कादंबरीला साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार-२०१५ साली मिळाला आहे. मात्र ह्या कादंबरीत हरिपुरा लभान-बंजारा समाजाच्या तांड्याचे वर्णन लेखकाने केले असून समाजातील स्त्रियांविषयी अश्र्लील लिखाण त्यात केले आहे. त्यामुळे बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या आहे. लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल केला जावा. यासाठी आज बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार अमोल मोरे व शहर पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात बंजारा समाज उपस्थित होता. लवकरात लवकर गुन्हा नोंदविण्यात यावे अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा बंजारा क्रांती दलाचे अध्यक्ष राकेश जाधव यांनी दिले आहे. यावेळी प्रदेश अध्यक्ष श्रावण चव्हाण, भारतीय बहुजन क्रांती दल तालुकाध्यक्ष संजय राठोड, प्रबोधनकार भिमराव जाधव, डॉ. तुषार राठोड, संदीप राठोड, सरपंच तुकाराम चव्हाण, सुभाष राठोड, राहूल राठोड, रामेश्वर राठोड, सरपंच प्रकाश राठोड, विकास राठोड, कोमल जाधव, संतोष राठोड, गोरशिकवाडी प्रविण चव्हाण, निवृत्ती जाधव, गोपाल चव्हाण, सचिन चव्हाण व मोठ्या प्रमाणात स्त्रिया ह्या उपस्थित होत्या.

https://www.facebook.com/508992935887325/videos/183615689763732

 

Protected Content