महसूल पथकाचा अवैध वाळूच्या दोन ट्रक्टरवर कारवाई “

 

रावेर : प्रतिनिधि । दोन दिवसापूर्वी अवैध वाळुने भरलेले ट्रक्टर दंड न करता सोडल्यानंतर आज रावेर महसूल विभागाने दोन अवैध वाळूने भरलेले ट्रक्टर पकडले आहे. प्रांतधिकारी कैलास कडलक यांनी खुलासे मागविण्याचे फर्मान देताच महसूल पथकाने कारवाई केली  आहे. 

 

आज महसूलच पथक अवैध वाळू विरुध्द कारवाई करत आहे. आज पहाटे पाच वाजता भोकरी कडून येत असतांना अवैध वाळुने भरलेले ट्रक्टर ( नं. एमएच १९ बिजी २३८२)  पकडले त्याची चौकशी केली असता त्यात अवैध वाळू होती . हे ट्रक्टर जप्त करण्यात आले आहे. दूसरे अवैध वाळूने भरलेले ट्रक्टर ट्रॉली धुरखेडा परीसरात विना नंबर पकडण्यात आले आहे.ट्रक्टर चालक फरार झाल्याने कोतवाल गणेश चौधरी यांनी चालवत आणून रावेर तहसिल  कार्यालयात जप्त करण्यात आले आहे.ही कारवाई  मंडळ अधिकारी सचिन पाटील,  विठोबा पाटील,  तलाठी दादाराव कांबेळे , यासिन तडवी आदीच्या  महसूल पथकाने केली आहे.

 

महसूल पथकाने कर्तव्याला  दिलेल्या तिलाजली बाबात रझोदा येथील राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे माजी प्रदेश सरचिटणीस आर के चौधरी यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे महसूल पथकाबाबत तक्रार केली आहे.यामुळे तालुक्यात  खळबळ उडाली आहे.

Protected Content