“छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे गुरू, वक्तव्य करण्यापूर्वी अभ्यास करा; त्यानंतरच वक्तव्य करा” – पालकमंत्री

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे गुरू आहेत. त्यांना कुणाला गुरू सांगण्याची गरज नाही, वक्तव्य करण्यापूर्वी इतिहासाचा अभ्यास करावा मगच वक्तव्य करावे” अशी प्रतिक्रिया पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा दोन दिवसांचा जळगाव दौरा होता. आज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जलतरण तलावचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील हे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर कोणताही व्यक्ती मोठा नाही किंवा कुणी लहान नाही. त्यामुळे राज्यपाल असो की कुणीही असो, त्यांनी आगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा अभ्यास करावा आणि मगच वक्तव्य करावे असा टोला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी राज्यपालांना लगावला.

Protected Content