यावल तालुका पोलीस पाटील संघटनेची कार्यकारणी जाहीर

यावल प्रतिनीधी । तालुका पोलिस पाटील संघटनेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली.  यात  संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी गिरडगाव येथील पोलिस पाटील अशोक रघुनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

तालुका पोलिस पाटील संघटनेची सर्वसाधारण सभा कृषी उत्पंन्न बाजार समीतीच्या सभागृहात पोलिस पाटील संघटनेचे खांन्देश अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यात यावल तालुका पोलिस पाटील संघटनेची तालुका कार्येकारीणी जाहीर  करण्यात आली असुन संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी गिरडगाव येथील पोलिस पाटील अशोक रघुनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी मकबुल मेहबुब तडवी यांची नियुक्ती करण्यात आली. सुरेश खैरनार सचिव चंन्द्रकांत पाटील सहसचिव किरण पाटील कार्येअध्यक्ष गणेश पाटील कार्येकारी अध्यक्ष गणेश वानखेडे तसेच संघटक अध्यक्षपदी सौ.प्रफुल्लाताई पाटील व सौ.माधुरीताई राजपूत यांची निवड करण्यात आली.

यावेळी गोकुळ पाटील,महेमुद तडवी,कैलास पाटील, जळगाव उपजिल्हाअध्यक्ष पंकज बडगुजर, माजी तालुका अध्यक्ष पवन पाटील,चंदु इंगडे,कैलास सोळंके,मनोज पाटील,दिपक पाटील इतर तालुक्यातील पोलिस पाटील याप्रसंगी मोठया संख्येने उपस्थीत होते . संघटनेचे अध्यक्ष अशोक पाटील व सर्व सदस्यांचे पोलिस निरीक्षक सुधीर पाटील व पोलिस उप निरीक्षक जितेंन्द्र खैरनार वरिष्ठ पोलीस उपनिरिक्षक पठान यांनी त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले.

 

 

 

Protected Content