खा. रक्षाताई खडसेंच्या पाठपुराव्याने वांजोळा चौकात होणार अंडरपास !

भुसावळ प्रतिनिधी । शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात वांजोळा चौकात अंडरपास उभारण्यासाठी परवानगी मिळाली असून खासदार रक्षाताई खडसे यांनी याबाबत पाठपुरावा केला होता.

याबाबत वृत्त असे की,चिखली ते तरसोद या मार्गावर नॅशनल हायवे चे कार्य प्रगतीपथावर आहे वांजोळा चौफुली वरून वांजोळा, गोंभी, गोजोरे, वराडसीम, सुनसगाव, बेल्हवाय ही गावे जोडलेली आहेत. तसेच भुसावळ शहरातील मोठी वस्ती पसरलेली आहे.

सर्व गावकरी व शहरातील लोक वांजोळा रोडवरुन दररोज राष्ट्रीय महामार्गा ओलांडून शहरात येतात. कारण एनएच-६ भुसावळ शहराचा भाग आहे.
यापूर्वी वांजोळा चौकात बर्‍याच दुर्घटना घडून लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. भविष्यात भुसावळ शहराचा वेगवान विस्तार लक्षात घेता प्रवाश्यांमध्ये वाढ होईल परिणामी हा चौक ओलांडताना अपघाताच्या घटनांमध्ये अचानक वाढ होईल अशी शक्यता होती.

या अनुषंगाने वांजोळा चौफुली वर अंडर पास होण्यासाठी वांजोळा, गोंभी, गोजोरे, वराडसीम, सुनसगाव, बेल्हवायचे सरपंच व शहरातील नगरसेवक यांनी खासदार रक्षाताई खडसे यांच्या कडे निवेदन दिलेले होते. यासंदर्भात खासदार रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता या मागणीला यश मिळून काल न्हाई चे प्रोजेक्ट डायरेक्टर चंद्रकांत सिन्हा यांनी खासदार रक्षाताई खडसे यांना मंजुरीचे पत्र पाठवले आहे.

Protected Content