नाहाटा महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुरवाडे यांना राज्यस्तरीय मराठी स्वाभिमान पुरस्कार

भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. उत्तम सुरवाडे यांना राज्यस्तीय मराठी स्वाभिमान पुरस्कारने नुकतेच मुंबईत सन्मानित करण्यात आले.

 

मराठी राज्यभाषा दिनानिमित्त शैक्षणिक, सामाजिक, तसेच माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, केंद्रीय संरक्षण मंत्री शरदचंद्र पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विद्यमान मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे, या सारख्या राजकीय सामाजिक, साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन करून महाराष्ट्रभर नावलौकिक प्राप्त केल्याबद्दल राज्यस्तरीय मराठी स्वाभिमान पुरस्कार देऊन भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा उत्तम सुरवाडे यांना मुंबईत सन्मानित करण्यात आले. हरहुन्नरी, कल्पक आणि सर्जनशील निवेदक, श्रोत्यांची मने जिंकणारा अभ्यासू वक्ता म्हणून त्यांचा महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध आहे.

 

हा पुरस्कार त्यांना जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र लेखक व कवी महासंघ यांच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री खा. अरविंद  सावंत, अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद, बिग बॉस फेम पत्रकार अनिल थत्ते, समाज सेविका चारुशिला देशमुख, यांच्या शुभहस्ते देण्यात आला. याप्रसंगी होम फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ.प्रवीण नीचत. लेखक साहित्यिक मा  विलास खानोळकर, कामगार नेते संपादक दैनिक मुंबई मित्र, अभिजीत राणे, ज्येष्ठ कवी मकरंद मकरंद वांगणे कर, मराठी चित्रपट निर्माता व दिग्दर्शक प्रसाद तारकर, स्वागताध्यक्ष मा.प्रकाश जाधव, संयोजक सुरज भोइर यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शैक्षणिक सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे खास अभिनंदन केले आहे.

Protected Content