सुशांत व रियाला ड्रग्ज पुरवणारा अटकेत

 

मुंबई प्रतिनिधी । सुशांत राजपूत आणि त्याची प्रेयसी रिया यांना ड्रग्जचा पुरवठा करणार्‍या करमजीत या आरोपीला आज एनसीबीच्या पथकाने अटक केली आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात रियाच्या तपासात या प्रकरणात अनेक महत्त्वाचे धागेदोरे एनसीबीच्या हाती लागले आहेत. आज आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. ड्रग्ज कनेक्शनमध्ये एक मोठा मासा एनसीबीच्या गळाला लागला आहे. करमजीत असं या आरोपीचं नाव आहे.

एनसीबीने छापेमारीदरम्यान धडक कारवाई करताना करमजीत नावाच्या व्यक्तीला अटक केली. ड्रग्ज जगतात तो ‘केजे’ या नावाने प्रसिद्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. करमजीत हा कॅपरी आणि लिटिल हाइट्स हे ड्रग्ज सप्लाय करायचा अशी समोर आली आहे.

करमजीत हा सॅम्युअल मिरांडा आणि रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीला ड्रग्ज सप्लाय करायचा. नंतर त्यांच्यामार्फत ड्रग्ज रिया आणि सुशांतपर्यंत पाहचत असल्याचं एनसीबीच्या तपासात पुढे आलं आहे. करमजीतची एनसीबीकडून सध्या कसून चौकशी सुरू आहे. रियाचा भाऊ शोविकशी त्याचा थेट संपर्क असल्याचं स्पष्ट झाल्याने त्याच्या चौकशीत महत्त्वाची माहिती उघड होण्याची दाट शक्यता आहे. रियाने दिलेल्या माहितीच्या आधारेड्रग्ज डीलर अनुज केशवानी, गौरव आर्या यांनीही महत्त्वाची महिती दिली असून गोवा आणि मुंबईत अनेक ठिकाणी छापे टाकून चौकशी करण्यात येत आहे.

Protected Content