मानवता हा सर्वात मोठा धर्म ‌- परमपूज्य विशेष सागरजी महाराज

जामनेर –  लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | हा हिंदू, तो जैन, असा धर्मात ,समाजात भेदभाव न करता सर्वांनी एक संघ होऊन काम करण्याची गरज असून मानवता सर्वात मोठा धर्म आहे. जो मानवता धर्म पाळतो तोच खरा महान” जूडो और जुडने दो ” ‘मिलो और मिलने दो ‘असा संदेश संदेश परमपूज्य विशेष सागर जी महाराज यांनी आपल्या प्रवचनातून दिला.

 

गणाचार्य श्री 108 विराग सागर जी गुरुदेव यांचे सुशिष्य श्रमणमुनी श्री 108 विशेष सागर जी गुरुदेव यांचा 26 वा चातुर्मास जामनेर येथे संपन्न होऊन मुनी श्रींचा सिद्ध क्षेत्र मांगीतुंगी येथे विहार व पदयात्रा प्रारंभ होऊन दुपारी तीन वाजता मुनीश्रींचे शेवटचे प्रवचन व भव्य पिंच्छी परिवर्तनाचा कार्यक्रम एकलव्य प्राथमिक विद्यामंदिर शिवाजीनगर जामनेर येथे संपन्न झाला .यावेळी समाजाच्या ज्येष्ठ महिला रत्नमाला जैन, कमलबाई  जैन, रूपाली कस्तुरे व संगीता कस्तुरे यांच्या हस्ते महाराजांना पिंच्छी प्रदान करण्यात आली. तर महाराजां जवळ असलेली पिंच्छी अलका मुद्दलकर यांना देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास  नगराध्यक्ष साधनाताई महाजन , शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील,माजी नगराध्यक्ष राजूशेठ बोहरा, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पारस ललवाणी, सुप्रसिद्ध व्यापारी महेंद्र शेठ नवलखा प्रकाश शेठ नवलखा यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते .प्रारंभी सकाळी सात वा. अभिषेक पूजन व गणाचार्य विरागसागर विधान संपन्न झाले. मनुश्रींचे पूजन व अतिथी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास देऊळगाव राजा कारंजा पुसेगाव भुसावळ अशा विविध ठिकाणाहून त्यांचे भक्तगण सामील झाले होते यावेळी श्वेतंबर, दिगंबर असा सकल जैन समाज उपस्थित होता.यावेळी माजी नगराध्यक्ष राजू शेठ बोहरा यांनी मनोगत व्यक्त केले. मुनीश्री विशेष सागर जी महाराज यांचे सिद्ध क्षेत्र मांगीतुंगी येथे पदयात्रा प्रारंभ होऊन असून जामनेर शहरातील दिगंबर जैन समाजातील युवक युवती यांच्यासह शेकडो समाज बांधव  पदयात्रेत सामील झाले होते.

Protected Content