चिंताजनक : २४ तासात २४ हजार ८५० नवे कोरोनाबाधित रुग्ण ; ६१३ जणांचा मृत्यू !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मागील चोवीस तासांत देशभरात २४ हजार ८५० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ६१३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

देशात कोरोनामुळे २४ तासांत मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातही दिलासा देणारी बाब म्हणजे भारतात रिकव्हरी रेट चांगल पाहायला मिळत आहे. आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ६ लाख ७३ हजार १६५ वर पोहोचली आहे. त्यापैकी ४ लाख ०९ हजार ०८३ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. भारतात कोरोना संसर्गातून बरे होण्याचा रिकव्हरी रेट ६० टक्क्यांवर पोहोचल्याने काहीसा दिलासादायक बाब असल्याचे मानले जात आहे. देशभरात ४ जुलै पर्यंत तब्बल ९७ लाख ८९ हजार ६६ नमूने तपासण्यात आले आहेत. यातील २ लाख ४८ हजार ९३४ नमुण्याची तपासणी काल झाली आहे. आयसीएमआरने ही माहिती दिली आहे.

Protected Content