Home Uncategorized खान्देशपुत्र सी. आर. पाटील गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष

खान्देशपुत्र सी. आर. पाटील गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष

0
116

अहमदाबाद वृत्तसंस्था । नवसारीचे खासदार तथा मूळचे भुसावळ तालुक्यातील रहिवासी असणारे सी. आर. पाटील यांची आज गुजरात प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

चंद्रकांत रघुनाथ पाटील उर्फ सी. आर. पाटील हे मूळचे भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव येथील रहिवासी आहेत. ते सध्या गुजरातमधील नवसारी येथील भाजपचे खासदार आहेत. १९८९ पासून ते राजकारणात सक्रीय आहेत. सध्या ते तिसर्‍यांदा खासदार म्हणून निवडून गेले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी तब्बल ६.८९ लाखांचे मताधिक्य मिळवले होते. देशात सर्वाधीक मतांनी निवडून येण्याचा बहुमान त्यांना मिळालेला आहे. याआधी ते गुजरात औद्योगिक वसाहतीचे (जीआयडीसी) अध्यक्ष देखील होते. त्यांच्या संपर्क कार्यालयास आयएसओ मानांकन मिळाले आहे. या पार्श्‍वभूमिवर, आता त्यांच्याकडे गुजरात भाजपची धुरा सोपविण्यात आली आहे.


Protected Content

Play sound