दुधाला प्रति लिटर १० रूपयांची वाढ मिळावी- गिरीश महाजन (व्हिडिओ )

जळगाव प्रतिनिधी । सध्या दुग्ध उत्पादक संकटात असल्याने दुधाला प्रति लीटर १० रूपये तर दुध भुकटीसाठी प्रति किलो ५० रूपयांचे अनुदान मिळावे मिळावी अशी मागणी आज माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केली. महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपतर्फे आज जिल्हाधिकार्‍यांना याबाबत निवेदन देण्यात आले.

कोरोनाच्या महामारीत दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत घट झाल्यामुळे गेल्या काही महिन्यापासून दुध उत्पादक शेतकऱ्यांना कमी भावाने दूध विक्री करावी लागत आहे. व त्याच बरोबर पशुखाद्याचे व चाऱ्याचे भाव हे दिवसेंदिवस गगनाला भिडत असून उत्पादकांना उत्पादन खर्चा इतकाही पैसा कमी भावामुळे मिळत नसून सदर व्यवसाय तोट्यात जात असून शेतकरी सर्व बाजूनी हैराण झाला आहे. तरी शासनाने दुधासाठी प्रतिलिटर १० रु अनुदान व पावडरसाठी ५० रु प्रति किलो अनुदान द्यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी जळगाव महानगरतर्फे करण्यात आली. याप्रसंगी आ. राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, गोपाळ भंगाळे, गिरीश बरडे, संजय भोळे., सुनील माळी, नगरसेवक जितेंद्र मराठे, आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/748848089018130/

Protected Content