भुसावळ नगरपरिषदेतर्फे पंधरवडा मोहिमे अंतर्गत थ्रोट स्वॅब शिबीर

भुसावळ, प्रतिनिधी । सध्या कोरोना विषाणूंचा संसर्ग तसेच कोरोनामुळे मयत होणाऱ्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी नगरपरिषदेतर्फे पंधरवडा मोहिमे अंतर्गत थ्रोट स्वॅब शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

तालुक्याला कोरोना व्हायरसपासून कसे आटोक्यात आणता येईल यासाठी नोडल अधिकारी अँड. तृप्ती भामरे यांनी भुसावळ शहरात वेगवेगळ्या१० ठिकाणी कोरोनाचे थ्रोट सॅब घेण्याची संकल्पना नगरपरिषदेला दिली. यावरून महात्मा फुले प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने “नगरपरिषद तुमच्या दारी “असा पंधरवाडा शिबिराचे आयोजन करून आतापर्यत सहा शिबीर यशस्वीरित्या पार पडले आहे. दिनांक २० जुलै रोजी सकाळी डी.एल.हिंदी हायस्कुलमध्ये १० ते २ वाजेपर्यत सोशल डिस्टनसींग व मास्क लावून हे शिबीर घेण्यात आले. या शिबिरामध्ये एकूण ४३ थ्रोट सॅब घेण्यात आले.
या प्रसंगी डॉ. तोसिफ खान, नोडल अधिकारी ऍड. तृप्ती भामरे, लॅब टेक्निशियन श्री. लोखंडे, लॅब असिस्टंट झइद आणि वरणगाव रोड नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आरोग्यसेविका,भानुदास चौधरी, प्रशांत चौधरी, नर्स सोनल सिस्टर अणि इतर उपस्थित होते. आतापर्यंत ७ शिबीर झाले. पुढील शिबीर २१ जुलै रोजी एक्सेल हॉस्पिटल, २२ जुलै रोजी आदर्श हायस्कूल,२३ जुलै रोजी महात्मा फुले प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आहे. परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घेण्याचेआवाहन करण्यात आले आहे.

Protected Content