पात्र घरकुल लाभार्थ्यांना न्याय द्या : मनसेची मागणी (व्हिडिओ)

धरणगाव, अविनाश बाविस्कर  | खर्दे बु. ।।   येथील शासनाच्या रमाई घरकुल योजनेस पात्र घरकुल लाभार्थीना पंचातय समितीतील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचेकडून विनाकारण फिरवा-फिरव करुन घरकुल योजनेपासून वंचित ठेवत असून पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यावर रक्कम वर्ग न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा  मनसे जिल्हा संघटक राजेंद्र एस.निकम यांनी आंदोलन दरम्यान दिला आहे. यानंतर सहाय्यक गट विस्तार अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

 

निवेदनाचा आशय असा की,   संघटनेचे धरणगाव तालुका उपसंघटक राजु बाविस्कर (कोळी) हे खर्दे बु.।। ता.धरणगाव जि.जळगाव या गावातील स्थानिक रहिवाशी आहेत. संबंधित गावामध्ये शासनाच्या रमाई घरकुल योजने अंतर्गत गावातील पात्र लाभार्थ्यांचे मागील १ ते २ वर्षापासून घरकुल मंजूर झालेले आहेत. संबंधित पात्र लाभार्थी हे घरकुल योजनेतील पात्र लाभार्थी असून घरकुल योजनेची पूर्ण फाईल ग्रामसेवक यांच्या सहीने व पंचायतीच्या ठरावाने मंजूर सुध्दा झालेल्या आहेत. ते पुढील कार्यवाहीसाठी पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी यांचेकडे वारंवार जाऊन त्यांचेकडे याबाबा विचारपूस करीत आहेत. परंतु संबंधित अधिकारी व कर्मचारी हे त्यांचे काहीएक ऐकून न घेता त्यांना उडवा-उडवीचे उत्तरे देऊन विनाकारण फिरवा-फिरव करीत आहेत व त्यांना शासनाच्या योजनेपासून जाणून-बुजून वंचित ठेवीत आहेत. याउलट जे लाभार्थी ज्यांचेकडे सद्यस्थितीत पक्के घरकुल आहेत, तसेच ज्यांच्याजवळ शेती आहे अशा लोकांची नावे पंचायत समितीतील संबंधित अधिकारी हे ऑनलाईन परस्पर टाकून घेतात. तसेच महत्वाचे म्हणजे गावातील एक १९ वर्षाचा मुलगा जो गावातील स्थानिक रहिवाशी नाही,गावात त्याचे नावावर जागा नाही, तसेच संबंधितांचे गावामध्ये मतदान सुध्दा नाही तरी सुध्दा त्याचे नाव आज रोजी ऑन लाईनमध्ये दिसून येत आहे. तरी संबंधितांचे नावे ग्रामपंचायतीचा ठराव नाही,त्याची घरकुल योजनेची फाईल तयार नाही. ग्रामसेवकांचे सही नाही, तरी सुध्दा त्याचे नाव ऑनलाईन येत आहे.याउलट ज्या पात्र लाभार्थ्यांची फाईल तयार आहे त्यांचे नावाचे ग्रामपंचायतीचे ठराव आहेत त्यांचे नावावर जागा आहे अशा पात्र लाभार्थ्यांना आपल्या पंचायत समिती विभागातील अधिकारी व कर्मचारी हे हेतूपुरस्कर,जाणून-बुजून त्यांना मानसिक त्रास देत आहेत, संबंधितांना त्रास देण्याचा उद्देश हाच दिसून येतो की, त्यांना यामध्ये काहीतरी चिरी-मिरी पाहिजे आहे यामुळेच संबंधितांना ते फिरवा-फिरव करुन परत पाठवित आहेत. तरी संबंधित रमाई घरकुल पात्र लाभार्थ्यांच्या घरकुल योजनेच्या फाईल लवकरात लवकर मंजूर करण्यात येऊन त्यांचे नावावर बँक खात्यांमध्ये शासनाची रक्कम जमा करण्यात यावी. संबंधित पात्र लाभार्थ्यांचे बँक खातेवर पुढील १० दिवसांचे आत रक्कम टाकली न गेल्यास मनसे स्टाईलने आपल्या कार्यालयासमोर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

 

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना धरणगाव येथील पंचायत समिती यांच्या समोर आंदोलन केले‌. यावेळी  जिल्हा संघटक राजेंद्र एस. निकम, तालुका संघटक राजू बाविस्कर, तालुका उपसंघटक राजु सुका कोळी, संदीप पाटील, महेश माळी, मनोज खुळे,‌ समाधान वानखेडे, सुनील वानखेडे, विजय केदळे, तुकाराम कोळी,  दगडू सोनवणे, गणेश कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते, त्यांनी  निवेदन साहाय्यक बी.डी. ओ. देशमुख यांना दिले.

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/197322525716384

Protected Content