Home Cities जळगाव स्वामिनारायण मंदिरात ‘घागर भरणी’चा सोहळा; मंदिरात भाविकांचा महासागर

स्वामिनारायण मंदिरात ‘घागर भरणी’चा सोहळा; मंदिरात भाविकांचा महासागर

0
126


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील श्री स्वामिनारायण मंदिरात अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘घागर भरणी’चा सोहळा अत्यंत भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. या पवित्र सोहळ्यात २५०० हून अधिक भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवला.

अक्षय्य तृतीया हा दिवस सनातन धर्मात अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी केलेले दान, जप, तप आणि पुण्यकर्म अक्षय फळ देतात, अशी धार्मिक मान्यता आहे. याच पार्श्वभूमीवर, या दिवशी पितृमोक्षासाठी विशेष महत्त्व असल्याने उपस्थित भाविकांनी आपल्या पितरांचे स्मरण करून तर्पणविधी केला. प्रत्येक भाविकाने आपल्या पितरांची नावे घेत गोत्रोच्चार केला आणि ब्राह्मण व संतांच्या मार्गदर्शनाखाली विधिपूर्वक घागर भरणी केली. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी भाविकांनी विशेष प्रार्थना केली.

या सोहळ्याला परमपूज्य गोविंदप्रसाददासजी स्वामी, परमपूज्य दिव्यप्रकाशदासजी स्वामी आणि अतुल भगत यांच्यासह अनेक संत-महंत उपस्थित होते. संतांच्या आशीर्वादाने कार्यक्रमाला आध्यात्मिक उंची प्राप्त झाली. उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना संतांनी अक्षय्य तृतीयेचे महत्त्व, तसेच धर्म, सेवा आणि भक्तीच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले.

हा संपूर्ण सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या उपक्रमामुळे भाविकांमध्ये आध्यात्मिक जागरूकता वाढली असून, समाजात धर्मभावना अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले.


Protected Content

Play sound