मालवाहू वाहनाला लक्झरीची जोरदार धडक; चालकासह महिला जखमी

जळगाव प्रतिनिधी । बांभोरीकडून जळगाव कडे येत असलेल्या टाटा मॅजिक मालवाहू गाडीला समोरून येणाऱ्या लक्झरीने जोरदार धडक दिल्याची घटना २५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता घडली. यात मालवाहू वाहनावरील चालक व महिला हे दोघे जखमी झाले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात लक्झरीचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र अरूण सपकाळे (वय-२८) रा. वेडी माता मंदिरामागे दिनकर नगर जळगाव यांचे मालकीची (एमएच ०४ एफयू ३५3९ ) टाटा मॅजिक मालवाहू वाहन आहे. २७ सप्टेबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास हे वाहनाने बांभोरीहून जळगाव येथे येत असताना बांभोरी पुलाजवळ समोरून येणाऱ्या (एमएच १९ वाय ९४५९) क्रमांकाच्या लक्झरीने जोरदार धडक दिली. यात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून टाटा मॅजिकवरील चालक जितेंद्र अरुण सपकाळे हे जखमी झाले आहे. तसेच सोबत असलेले द्रौपदाबाई या देखील बसलेला असताना त्यांचा कमरेला मार बसला आहे. दोघांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी जितेंद्र सपकाळे यांच्या फिर्यादीवरून लक्झरी (एमएच १९ वाय ९४५९) वरील चालक दीपक भागवत सोनवणे रा. सावदा ता.रावेर याच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल हरिलाल लक्ष्मण पाटील करीत आहे.

 

 

 

 

Protected Content