संत निवास व जलकुंभच्या कामासाठी जी मदत करता येईल ती करु – पालकमंत्री

फैजपुर प्रतिनिधी । फैजपुर येथील खंडोबावाडी देवस्थान येथे होणारे संत निवास व जलकुंभ हे काम कायमस्मरणात राहणारे काम आहे आणि जी मदत करता येईल, ती करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते खंडोबावाडी देवस्थान येथे संत निवास व जलकुंभ भूमिपूजन सोहळा प्रसंगी बोलत होते.

खान्देशातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले फैजपूर नगरीचे आराध्य दैवत श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान, खंडोबा वाडी फैजपूर मंदिर परिसरात भव्य दिव्य असे संत निवास उभारण्यात येणार असून यांसह पाण्याचा जलकुंभ देखील बनविण्यात येणार आहे.या कामासाठी तिर्थक्षेत्र विकास निधीतून खंडोबा देवस्थान साठी ४० लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे. या निधिसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षाताई खडसे,आमदार शिरीष चौधरी यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी प्रयत्न केले असून या प्रयत्नांना यश आले आहे.आज सोमवार दि.२७ सप्टेंबर रोजी संत निवास तसेच जलकुंभाचा भुमिपुजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी अध्यक्षस्थानी आमदार शिरीष चौधरी होते.तर संत निवास भुमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तर जलकुंभाचे भूमिपूजन खा. रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले.तर कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन सतपंथ संस्थान गादिपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, स्वामिनारायण गुरुकुल सावदा उपाध्यक्ष शास्त्री भक्तीकिशोरदास महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संस्थानचे गादिपती महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज यांनी प्रास्तविकातून खंडोबा देवस्थान ची थोडक्यात आख्यायिका सांगितली.

यानंतर महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज महाराज फैजपुर परिसराची जमीन सुपीक आहे.पालकमंत्री व आमदार यांच्या माध्यमातून या परिसरात प्राथमिक गरजा पूर्ण व्हाव्या अशी अपेक्षा व्यक्त करून आराध्य दैवत श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थानची होळीला भरणारी यात्रा पाच दिवसाऐवजी सात दिवसाची यात्रा करता यावी यासाठी प्रयत्न व्हावे अशी त्यांनी मागणी केली. तर आ शिरीष चौधरी म्हणाले की खंडोबा देवस्थान साठी पुढच्या काळात जसजसे आदेश संत महंत करतील काहीना काही देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि जी मदत करता येईल ती करण्याचा प्रयत्न करू असा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जो शब्द दिला तो मनापासून पाळणार आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा रंजनाताई पाटील,जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, मसाका चेअरमन शरद महाजन,जि प गटनेता प्रभाकर सोनवणे,पं.स.सभापती पल्लवी चौधरी, जिल्हा दूध संघ संचालक हेमराज चौधरी,युवा नेता धनंजय शिरीष चौधरी,प्रांताधिकारी कैलास कडलग,यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मुन्ना पाटील,यावल पं स सदस्य शेखर पाटील,शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख सौ रजनी चौधरी,नागा गोविंददास महाराज,प्रवीणदास महाराज, काँग्रेस गटनेता कलिम खान मण्यार,राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता शेख कुर्बान,सामाजिक कार्यकर्ते रवींद्र होले,नगरसेवक केतन किरंगे,अमोल निंबाळे,भुसावळ, माजी नगरसेवक अप्पा चौधरी,शिवसेना तालुका उपप्रमुख राजू काठोके, जितेंद्र भारंबे,भाजपा ओबीसी मोर्चाच्या सौ.दिपाली चौधरी झोपे,भाजपा शहर अध्यक्ष अनंता नेहेते, मध्य रेल्वेचे मुन्ना सिंग यांच्यासह भाविक भक्तगणउपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ रुपाली चौधरी,डॉ सागर धनगर,  तर आभार प्रा. जी.पी.पाटील सर यांनी मानले.

 

Protected Content