उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जळगावात आगमन

जळगाव, राहूल शिरसाळे | राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जिल्हा दौर्‍यावर आगमन झाले असून आज सकाळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह मान्यवरांनी स्वागत केले.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सकाळी सव्वाआठच्या सुमारास जळगाव विमानतळावर आगमन झाले. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे, गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, आ. अनिल भाईदास पाटील, महापौर जयश्रीताई महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जि.प. सीईओ डॉ. पंकज आशिया,महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री विमानतळावून अजिंठा विश्रामगृहाकडे जात असतांना पक्षाच्या जिल्हा कार्यालयाच्या जवळ महानगर राष्ट्रवादीतर्फे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर ते अजिंठा विश्रामगृहात निवडक सहकार्‍यांशी संवाद साधणार आहेत. यानंतर ते जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत करण्यात आलेल्या आढावा बैठकीला उपस्थिती देणार आहेत. तसेच यानंतर जळगाव जिल्हा सहकारी दुग्ध उत्पादक संघ मर्यादित, जळगाव- नवीन आधुनिक दूध प्रक्रिया व पॅकींग प्लँट आणि नविन दुग्धजन्य पदार्थ उत्पादन प्लँटचा उदघाटन सोहळा उपमुख्यमंत्री याच्याहस्ते पार पडणार आहे.

यानंतर मुख्यमंत्री दुपारी भुसावळ येथे जाणार आहेत. भुसावळ येथे सरदार वल्लभभाई पटेल पुतळाजवळ भूसावळ नगर परिषद आयोजित विविध कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री याच्याहस्ते संपन्न होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष जळगाव जिल्हा आयोजित कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळ्यास ते उपस्थित राहतील. त्यानंतर जामनेर रोड, भुसावळ येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाच्या नूतनीकृत संपर्क कार्यालयाचे ते उदघाटन करणार आहेत.

Protected Content