यावल वनविभागाच्या कारवाईत सागवान लाकूड जप्त

यावल प्रतिनिधी । बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राज्य मार्गावरील परिसरात विना परवाना सागवान लाकडाची वाहतूकीवर यावल वनविभागाने कारवाई केली असून ८ हजार किंमतीचे सागवान लाकूड जप्त केले आहे. याप्रकरणी यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, यावल शहरातील बुऱ्हाणपुर-अंकलेशवर या राज्य मार्गावरील मश्जिद परिसरात विनापरवाना सागवान जातीच्या लाकडांची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती यावल वनविभागाच्या पथकाला गुरूवार १६ डिसेंबर रोजी सायंकाळी मिळाली. त्यानुसार वनविभागाचे  सहाय्यक वनसंरक्षक पी. व्ही. हाडपे यांच्यासह यावल पश्चिम वनक्षेत्रातील पथकातील वनपाल , वनसंरक्षक , पोलीस नाईक , वाहनचालक यांनी धडक कारवाई करत सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास विनापरवाना वाहतूक होत असलेले ८ हजार रूपये किंमतीचे सागवान जाती लाकुड ९ नग १३० घनमीटर जप्त करण्यात आले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पुढील सखोल चौकशी यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक पी.व्ही.हाडपे, यावल पुर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरकठोरा विभागाचे वनपाल करीत आहे.

Protected Content