वाहतूक पोलीसाचा प्रामाणिकपणा; सापडलेला मोबाईल केला परत

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरात मुलाला दवाखान्यात घेऊन आलेल्या एका व्यक्तीचा मोबाईल हरवला होता. हरविलेला मोबाईल शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याला सापडल्याने संबंधित व्यक्तीला परत केल्याचे पोलीसांमध्ये प्रामाणिक पणाचे दर्शन घडविले आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील रांजणगाव येथील संतोष नवगीरे यांच्या मुलाच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्याला आज दुपारी शहरातील खासगी दवाखान्यात घेऊन आले. नवगीरे हे घाईघाईने आल्यामुळे त्यांच्या खिश्यात ठेवलेला मोबाईल हरवला. त्यावर त्यांनी परिसरात खूप शोधाशोध केली. मात्र मोबाईल मिळून आला नाही. दरम्यान शहरातील सिग्नल चौकात शहर वाहतूक शाखेचे पो. अ. सहाय्यक फौजदार अरुण बाविस्कर व पोलीस अमलदार भास्कर भोसले हे आपले कर्तव्य बजावित असताना त्यांना सदर मोबाईल मिळून आला. त्यावर त्यांनी जिवाच्या आकांताने संपर्क साधून त्या व्यक्तीला मोबाईल सुपूर्द केला. यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

 

 

Protected Content