Home आरोग्य पहूर पोलीस स्थानकातील कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह

पहूर पोलीस स्थानकातील कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह

0
113

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । आजवर कोरोनाच्या प्रतिकारासाठी कार्यरत असणार्‍या पोलीस कर्मचार्‍याला या विषाणूची लागण झाल्याचे आजच्या रिपोर्टमधून दिसून आले आहे.

जामनेर तालुक्यातील पहूर पोलिस स्टेशन मध्ये सेवेत असलेल्या कोरोना योद्ध्याचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या पोलीस कर्मचार्‍याचा कुसुंबा येथे रहिवास असणार्‍या आईचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. यानंतर त्यांनीही खबरदारी म्हणून स्वॅब दिला होता. आज त्यांचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. आजवर त्यांनी कोरोनाच्या प्रतिकारासाठी प्रयत्न केले असून ते लवकरच यावर मात करून पुन्हा कर्तव्यावर रूजू होतील अशा भावना स्थानिक कोरोना योध्द्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आता पर्यंत सुमारे १५४ जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप पाटील त्यांनी सांगितले आहे.


Protected Content

Play sound