खामगावात होमिओपॅथिक डॉक्टरांची अभिनव रुग्णसेवा (व्हिडिओ)

खामगाव, अमोल सराफ  | मागील दोन वर्षापासून आरोग्य यंत्रणेची तारेवरची कसरत आपण पाहिली आहे आणि त्यातच आता पुन्हा एकदा त्यांच्यावर ताण न येण्या करता आपण सर्व ठणठणीत राहणे आवश्यक आहे आणि त्याकरता मिशन ओ 2 ने होमिओपॅथिक उपचाराच्या माध्यमातून परिसरातील मुख्यतः मूकबधिर व मतीमंद विद्यार्थ्यां करतात दर महिन्याला अखंडित रुग्ण तपासणी संकल्पना आणली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगावचे पंचशील होमिओपॅथिक विद्यालयचे नाव संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. त्याच होमिओपॅथिक विद्यालयातील प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी व साई होमिओपॅथिकची तज्ञ टीम व मिशन ओ 2 ची चमू यांच्या वतीने खामगावातील टिळक राष्ट्रीय विद्यालयातील विद्यार्थी, रोटरी क्लबचे मतीमंद व खामगाव येथील मूकबधिर विद्यालय यातील विद्यार्थ्यांकरता आता मोफत आरोग्य निदान व उपचाराचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेषतः या शिबिरामध्ये फक्त एकदाच तपासणी न करता महिन्याच्या प्रत्येक एका रविवारी शहरातील पंचशील होमिओपॅथिक रुग्णालय, साई होमिओपॅथिक टीमच्या वतीने त्याचा मागोवा घेत पुढील औषधोपचार देखील मोफत करण्याचा मानस मिशन 2 च्या वतीने केला आहे. आज पार पडलेल्या या शिबिरामध्ये जवळपास 300 ते 400 विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांना त्यांचे आता नोंदणीकृत कार्ड देखील देण्यात आली आहे. यावर त्यांना आता पुढील कायमस्वरूपी उपचार भविष्यात मोफत दिल्या जाणार आहे.

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/697420731446165

 

Protected Content