फडणविसांपेक्षा शिंदेंना जास्त पसंती : शिवसेनेच्या जाहिरातीने चर्चेला उधाण

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एका वृत्तवाहिनीच्या सर्वेक्षणाच्या आधारे देण्यात आलेल्या शिवसेनेच्या जाहिरातीत फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना जास्त पसंती असल्याचे दर्शविण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

शिवसेनेने आज राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रांना पूर्ण पानी जाहिरात दिली असून यात झी मीडिया समूहाने महाराष्ट्रात केलेल्या सर्वेक्षणाचा आधार घेण्यात आला आहे. हीच जाहिरात आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. या जाहिरातील महाराष्ट्राती २६.१ टक्के जनतेला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्र हवेत तर देवेंद्र फडणवीस यांना २३.२ टक्के लोकांची पसंती असल्याचे एका सर्व्हे मध्ये समोर आल्याचे या शिवसेनेच्या जाहिरातीमध्य म्हटले आहे. या जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंपेक्षा तब्बल तीन टक्के मते कमी मिळाल्याचे सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, या जाहिरातीमध्ये महाराष्ट्रातील जनतेने ४९.३ टक्के जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शवल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे. दरम्यान फडणवीस आणि शिंदे यांची या जाहिरातीमध्ये एकंदरीत तुलना करण्यात आली आहे. या सर्व्हेमध्ये भाजपला ३०.२ टक्के आणि शिवसेनेला १६.२ टक्के जनतेने कौल दिला आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील ४६.४ टक्के जनता भाजप शिवसेनेच्या युतीसोबत असल्याचा दावा देखील जाहिरातीत केला आहे. यामुळे आता शिवसेना आणि भाजपमध्ये सारेच काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Protected Content