मुक्ताईनगरच्या तहसीलदार श्‍वेता संचेती यांची बदली : डी. एल. मुकुंदे येणार

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील तहसीलदार श्‍वेता संचेती यांची बदली झाली असून त्यांच्या ठिकाणी नांदुरा येथून डी. एल. मुकुंदे हे येणार आहेत.

मुक्ताईनगर येथील तहसीलदार श्‍वेता संचेती यांची बदली होणार असल्याची कधीपासूनच चर्चा होती. अलीकडेच झालेल्या तहसीलदारांच्या बदल्यांमध्ये त्यांचे नाव नसल्याने त्या येथे अजून काही दिवस राहणार असल्याचे मानले जात होते. मात्र आता त्यांची येथून बदली झाली असून काल रात्री याबाबदचे आदेश शासनातर्फे निर्गमीत करण्यात आले आहेत. त्यांची त्र्यंबकेश्‍वर येथे तहसीलदारपदी बदली झाली आहे.

दरम्यान, श्‍वेता संचेती यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या तहसीलदारपदी बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथून डी.एल. मुकुंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते लवकरच आपल्या पदाचा कार्यभार सांभाळतील अशी माहिती महसूल खात्यातील सूत्रांनी दिली आहे.

Protected Content