चुंचाळे फाटा ते चुंचाळे गावापर्यंतच्या रस्त्यांचे डांबरीकरण निकृष्ठ दर्जाचे

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील बु्ऱ्हाणपुर अंकलेश्वर मार्गाशी जोडलेला चुंचाळे फाटा ते चुंचाळे गाव या रस्त्याची अत्यंत दयानिय अवस्था झाली असुन या मार्गावरून वाहन चालविणे जिकरीचे झाले आहे. यातील काही रस्त्याचे मागील काही महिन्यापुर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. या रस्त्याची देखील ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट प्रतिच्या कामामुळे पुनश्च वाईट अवस्था झाली आहे.

यावल तालुक्यातील चुंचाळे या गावा पासून ते चुंचाळे फाटया पर्यंतच्या मार्गावरील सुमारे ७ किलोमिटर रस्त्यांची ठीकठीकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अत्यंत वाईट अवस्था झाली असुन हा रस्ता दुरुस्ती व्हावा, या मागणीसाठी काही सामाजीक संघटनांनी आंदोलने देखील केली होती . या आंदोलनामुळे या लोकप्रतिनिधीच्या आश्वासनानंतर या मार्गावरील दोन ते तीन किलोमिटरचा रस्ता सुमारे १४ लाख रूपये खर्च करून काही महीन्यापुर्वीच डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र संबधीत ठेकेदाराने या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट प्रतिचे केल्याने हा रस्ता पुनश्च आपल्या जुन्या रूपात दिसु लागला असून, ठेकेदाराने केलेल्या अशा प्रकारच्या रस्ता डांबरीकरणामुळे शासनाचे १४ लाख रुपये पाण्यात गेल्याची संत्पत प्रतिक्रीया वाहनधारक व चुंचाळे गावातील व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. या रस्त्याची तात्काळ दखल घेत दुरूस्तीन झाल्यास काही दिवसात या मार्गाने येणारी एसटी बस व ईतर वाहनांची वाहतूक बंद होईत अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे

Protected Content