ट्रॅक्टरची दुचाकीला धडक : महिला ठार; बालक जखमी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील वरणगाव येथे भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार झाली असून तिचा मुलगा जखमी झाली आहे.

याबाबतचे वृत्त असे की, काल दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास शहरातील गुरांच्या बाजारासमोरून ममता राजेंद्र धनगर या आपल्या मुलासह एमएच१९ बीझेड १०५७ क्रमांकाच्या मोपेडवरून जात होत्या. यात बेदरकारपणे भरधाव चाललेल्या एमएच ३४ एल ७११३ या क्रमांकाच्या ट्रॅक्टर चालकाने जोरदार धडक दिली. यात ममता राजेंद्र धनगर ( वय ३५, रा, जगदंबानकर, वरणगाव ) यांचा मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा कृष्णल हा जखमी झाला आहे.

अपघात होताच ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. दरम्यान, जखमी कृष्णल राजेंद्र धनगर याला दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात रवींद्र गोविंदा धनगर यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरिक्षक किशोर पाटील हे करत आहेत.

Protected Content