पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते शिधा वाटपाचा शुभारंभ

पारोळा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा संकल्पनेतुन व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुरदृष्टीने राज्यभरातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना या शिधाधारक नागरीकांची ही दिवाळी आनंदाची व गोड जावी यासाठी, शिधाधारक कुटुंबाला चणादाळ १ किलो, रवा १ किलो, साखर १ किलो, पामतेल १ लिटर असा एकुण शिधा फक्त १०० रूपयांत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

पात्र शिधाधारकांना आमदार चिमणराव पाटील यांच्या शुभहस्ते आज शिधाजिन्नस संचाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पारोळा बाजार समिती मा.संचालक चतुरभाऊसाहेब पाटील, तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, जिजाबरावबापु पाटील, तहसिलदार अनिल गवांदे, शेतकी संघ चेअरमन गणेश पाटील, संचालक सखाराम चौधरी, अरूणआबा पाटील, नाना पाटील, भिकनआप्पा महाजन, जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील, भुपेंद्रभाऊ मराठे, पुरवठा निरीक्षण अधिकारी आर.व्ही.महाडीक, पुरवठा अधिकारी व्ही.बी.गिरासे, शेतकी संघ व्यवस्थापक भरत पाटील, उपतालुकाप्रमुख समाधान मगर, बाहुटे सरपंच अरूण पाटील, शंतनु पाटील, संजय पाटील, महेश मोरे, सुनिल निकम, अस्लम खाटीक तसेच पारोळा तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार व लाभार्थी उपस्थित होते.

यासमयी आमदार चिमणराव पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसह स्वस्त धान्य दुकानदार धारकांना सांगितले कि, सदरील योजना हि गरिब-गरजु शिधाधारकांची हि दिवाळी आनंदाची व गोड व्हावी यासाठी राबविण्यात येत आहे. यात गोर-गरिब-गरजु लाभार्थी असलेल्या शेवटच्या कुटुंबापर्यंत हा शिधाजिन्नस संच कसा पोहोचेल यासाठी विशेष काळजी घ्यावी, अधिकाऱ्यांनी संच वाटपाकडे बारकाईने लक्ष ठेवुन कुठलाही गैरप्रकार होवू याची दक्षता घ्यावी.

Protected Content