दुचाकींची समोरा-समोर धडक : एक तरूण ठार, दोन जखमी

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दोन दुचाकींची वळणावर समोरा-समोर धडक झाली असून यात एक जण ठार झाला असून दोन जखमी झाले आहेत.

या संदर्भातील माहिती अशी की, सावदा ते कोचूर रस्त्यावरील पहिल्या वळणावर आज दोन दुचाकींची समोरा-समोर जोरदार टक्कर झाली. या अपघातात एक जण ठार झाला असून दोन जखमी झाले आहेत. दुपारी बारा वाजेच्या सुमारास हा अपघात घडल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रूग्णालयात दाखल केले.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एमएच१५ डीव्ही १३०६ आणि एमएच१९ डीजी ८४६७ क्रमांकांच्या बाईक यांची समोरासमोर धडक झाली. यात कुणाल मधुकर साळी यांचा मृत्यू झाला असून यश किशोर धांडे आणि पुष्कर हेमा बढे हे दोन जण जखमी झाले आहेत. जखमी झालेले दोन्ही जण हे चिनावल येथील रहिवासी असून त्यांना फैजपूर येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. तर, याबाबत सावदा पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरू होते.

Protected Content